Home पंढरपूर पोलिस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस प्रशासनात मोठी खळबळ.

पोलिस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस प्रशासनात मोठी खळबळ.

622
0

पंढरपूर:- पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या लाॅकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या तुंगत येथील आरोपीने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अर्जून दिगंबर शितोळे अस आत्महत्या करणार्या संशयित आरोपीचे नाव आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीची प्रकृती गंभीर आहे.

आलीकडेच संशियीत आरोपीने तुंगत गावातील एका मतीमंद महिलेवर अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोपी तो पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील जेल मध्ये होता. दरम्यान आज पहाटे आरोपी शितोळे याने कोडठीतच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ त्याला पंढरपुरातील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटने नंतर जिल्हा पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे यांनी रूग्णालयाला भेट देऊन आरोपीच्या प्रकृतीची चौकशी केली.