Home पंढरपूर पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल .

पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल .

649
0

मंगळवेढा:- पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक व पोलिस हवालदार हे शासकिय कामकाज करीत असताना बोराळे येथील प्रमोद यशवंत पाटील याने शिवीगाळ व बघून घेण्याची धमकी देवून दैनंदिन कामकाजाची कागदपत्रे अंगावर भिरकावून मोबाईल तोंडावर फेकून मारल्याप्रकरणी पाटील यांचेविरूध्द शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची हकिकत अशी, दि. 13 रोजी सकाळी 11.00 वा. यातील फिर्यादी तथा बोराळे बीटचे पोलिस हवालदार सुनिल गायकवाड व पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी हे मंगळवेढा पोलिस ठाण्यातील अधिकारी कक्षात दैनंदिन शासकिय कामकाज करत होते. यावेळी तक्रारदार लक्ष्मण अशोक माने व त्याचा भाऊ हणमंत माने यास आरोपी प्रमोद पाटील हे शिवीगाळ व दमदाटी अधिकारी कक्षात करत असताना त्यास तुमची काय तक्रार असेल तर रितसर नोंदवा असे म्हणताच,पोलिस उपनिरिक्षक पुजारी यांच्या टेबलवर ठेवलेले दैनंदिन कामकाजाची कागदपत्रे उचलून ती त्यांच्या अंगावर भिरकावून टाकली. तसेच हातातील मोबाईल फिर्यादीच्या तोंडावर फेकून मारला. आरोपीस पकडत असताना धक्काबुक्की करून ,कन्नड व मराठी भाषेतून पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी,फिर्यादी सुनिल गायकवाड यांना तसेच अशोक माने,भाऊ माने आदींना खालच्या पातळीवर शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे हे करीत आहेत.