Home पंढरपूर पोलिस निरिक्षक विश्वास साळोखेंना चार वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा.

पोलिस निरिक्षक विश्वास साळोखेंना चार वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा.

7412
0

आमदार भारत भालकेंबरोबरच्या वादामुळे होते चर्चेत.

पंढरपूरः पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांना चार वर्षे सक्त मजूरी शिक्षा झाली आहे. तीन वर्षांपूर्वी ते मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना त्यांना लाच घेण्याच्या प्रकरणात अटक केली होती. सोलापूरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांच्याशी झालेला वादामुळे विश्वास साळोखे चर्चेत होते.