Home पंढरपूर प्रणव परीचारकांच्या वाढदिवसालाच प्रणव समर्थक नगरसेवक देणार राजीनामा

प्रणव परीचारकांच्या वाढदिवसालाच प्रणव समर्थक नगरसेवक देणार राजीनामा

889
0

पंढरपूर :- पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त झालेले तीन नगरसेवकांना आज राजीनामे देण्याचे आदेश शहर विकास आघाडी कडून देण्यात आले आहेत. आज जिल्हाधिकाऱयांकडे हे नगरसेवक आपले राजीनामे सादर करणार आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये नगरपालिकेत या तीन नगरसेवकांच्या माध्यमातून प्रणव पर्वाला सुरवात झाली आणि आज प्रणव परीचारकांच्या वाढदिवासालाच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागत आहे.
आंबेडकरी चळवळीतील तरुण कृष्णा वाघमारे, सनी मुजावर आणि अंबादास धोत्रे यांना पंढरपूर शहर विकास आघाडीने दहा महिन्यासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली होती. फेब्रुवारी मध्ये नियुक्ती आणि मार्च पासून लॉकडाऊन. त्यामुळे या नगरसेवकांना सभागृहात थेट काम करता आले नाही. मात्र कृष्णा वाघमारे सारख्या तरुणाने या संकटाचे संधीत रूपांतर केले. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढत होता. महापूर चाळीत कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली. मात्र प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या सहकार्याने पंढरपूरची धारावी म्हणून ओळख असलेल्या महापूर चाळीला कोरोना मुक्त करून दाखवले. कोरोना काळात कृष्णा वाघमारे यांनी जनमाणसात उतरून एक नवा पॅटर्न तयार केला. आणि नगरसेवकांचे खरे काम कुठं आहे हे दाखवून दिले.
सनी मुजावर यांनी देखील कोरोना काळात गरिबांना अन्न धान्य वाटपापासून ते निवारा मिळवून देण्यापर्यंत आपल पद खर्ची घातलं. नगरसेवक अंबादास धोत्रे यांनी पडद्याआड पक्षाचा अजेंडा राबवला.

एकंदरीतच आपला नगरसेवक पदाचा पूर्ण कार्यकाळ क्वारंटाईन गेल्याने थोडासा हिरामुस झाला पण कोणत्याही टेंडरच्या मागे न लागता या प्रणव पर्वाच्या शिलेदारांनी जनतेच्या मनात कायमच घर केलं हे महत्वाचं.
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने पंढरपूरच राजकीय समीकरण बदलणार आहे. याच पार्श्वभूमीवर 2021 मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होताहेत. याचा विचार करूनच पुढील दहा महिन्यासाठी नगरसेवकांच्या निवडी होणार आहे. कुणाला मिळणार संधी ? कोण आहेत प्रणव परीचारकांचे पुढचे शिलेदार लवकरच सोलापूर डेलीवर.