Home ताज्या बातम्या प्रतिभा क्रिएशन्सचा शुक्रवारी लघुपट महोत्सव

प्रतिभा क्रिएशन्सचा शुक्रवारी लघुपट महोत्सव

195
0

पंढरपूर येथील प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा लघुपट महोत्सव येत्या शुक्रवारी 7 जून रोजी येथील कर्मयोगी सभागृहात होणार आहेत. अशी माहीती प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने संदिप पिटके यांनी दिली आहे. 

प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून पंढरपूरात लघुपट अर्थात शॉर्टफ्ढिल्म महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आजपर्यत केवळ जिल्हास्तरावर सदरचा महोत्सव घेण्यात आलेला होता. मात्र यंदाच्या वर्षी राज्यस्तरीय लघुपट महोत्सव घेण्यात आला आहे. यामधे मुंबई , पुणे , नाशिक , रत्नागिरी , औरंगाबाद आदि परिसरात अतिशय दर्जेदार लघुपटांनी आपल्या प्रवेशिका दाखल केल्या होत्या. या सर्व लघुपटापैकी अत्यंत निवडक लघुपटांचे प्रदर्शन यावेळी अर्बन बॅकेच्या कर्मययोगी सभागृहामधे येत्या 7 जून रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. 

विशेष म्हणजे यंदा या महोत्सवामधे सर्वोत्कृष्ट लघुपट , सर्वोत्तम दिग्दर्शक , सर्वोत्तम अभिनेता , बालकलाकार , सर्वोत्तम संगीत अशा विविध प्रकारांमधे पारितोषिके दिली जाणार आहेत. तरी या महोत्सवास पंढरपूरातील रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवावी. असे आवाहन याप्रसंगी करण्यात आलेले आहे.   
 
सदरच्या महोत्सवाकरिंता प्रतिभा क्रिएशन्सचे अध्यक्ष ज्ञानेश बोंबलेकर , उपाध्यक्ष कन्हैय्या उत्पात , खजिनदार धनंजय मनमाडकर , महोत्सव समन्वयक वासुदेव पुजारी यांच्यासह विशाल तपकिरे , संकेत कुलकर्णी , पदमनाभ देवडीकर , स्वप्निल जोशी , अमित उत्पात , गणेश हरिदास , विनया उत्पात , सचिन कुलकर्णी अनवलीकर , शशांक चिंचणीकर आदि परिश्रम घेत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here