Home सोलापूर अज्ञात कारणावरुन फुटबॉल कोचची बेदम मारहाण करुन हत्या.

अज्ञात कारणावरुन फुटबॉल कोचची बेदम मारहाण करुन हत्या.

899
0

पंढरपूर :- सोलापूर शहरात अज्ञात कारणावरुन फुटबॉल कोचची बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. प्रदीप विजय आलाट(वय-२६ रा. रेल्वेलाईन, कुमार चौक सोलापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

काही लोकांनी प्रदीपला बेदम मारहाण केली. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला मृत्यू घोषित केले. त्यानंतर रुग्णालय परिसरात एकच गर्दी झाली. आरोपींना अटक तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. प्रदीप हा फुटबॉल कोच असून तो शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतो. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची चर्चा शहरात सुरु आहे.