Home पंढरपूर बडवे प्रतिष्ठान च्या वतीने मनसेचे दिलीप धोत्रेंचा सन्मान.

बडवे प्रतिष्ठान च्या वतीने मनसेचे दिलीप धोत्रेंचा सन्मान.

117
0

 पंढरपूर:- समस्त बडवे समाज तथा ब्राम्हण समाजाच्या वतीने मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांचा नुकताच गौरव करण्यात आला. कोरोनाकाळात ब्राम्हण समाजासह सर्वच घटकांना धोत्रे यांनी केलेली भरीव मदत पाहता. गौरवपत्र देउन त्यांचा सन्मान करण्यात आला.

   येथील समस्त बडवे समाज तसेच श्री संत प्रल्हाद महाराज बडवे प्रतिष्ठानच्या वतीने तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोनाकाळात सर्वसामान्य नागरीक रिकाम्या पोटी झोपणार नाही. यांची काळजी मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे यांनी घेतली होती. बारा बलुतेदारांसह ब्राम्हण समाजातील कष्टकरी वर्ग तसेच यजमानकृत्य आणि पौरोहित्य करणा-या व्यक्तींवर देखिल उपासमारीची वेळ आली. अशावेळी माणुसकी म्हणून मदतीचा हात दिलीप धोत्रे यांनी पुढे केला होता. अन किराणा मालासह जीवनोपयोगी वस्तूची मदत त्यांनी केली. त्यांच्या याच कार्याची दखल बडवे समाज आणि ब्राम्हण समाजाने घेत. धोत्रे यांच्याबददल कृतज्ञता व्यक्त केली.

   शहरातील योग भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये बडवे समाजच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव बडवे , अनिरूध्द बडवे , ह.भ.प.राणा महाराज वासकर , दामाजी कारखान्यांचे चेअरमन समाधान अवताडे , मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी आदिंच्या शुभहस्ते धोत्रे यांचा गौरव करण्यात आला.

बडवे समाजाचा गौरव स्वीकारल्यानंत मनसेचे दिलीप धोत्रे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्वच समाजघटकांसाठी आपण सध्या कार्य करीत आहे. यानिमित्ताने राजकारण न करता समाजकारणातून माणुसकी टिकवणे. हेच ब्रीद आपण राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पाळत आलो असल्यांचे त्यांनी यानिमित्ताने सांगत. बडवे समाज आणि ब्राम्हण समाजाप्रति आभार व्यक्त केले.