Home पंढरपूर बेकरी चालकाचा खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

बेकरी चालकाचा खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न.

1647
0

पंढरपूर :- शेवरे येथे एका व्यक्तीचा व चार चाकीमाल वाहतूक सह जाळुन केला खुन टेंभुर्णी :- माढा तालुक्यातील शिराळ( टें) येथील एका व्यक्तीचा अत्यंत क्रुरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार शेवरे (ता.माढा) येथील टेंभर्णी-अकलूज रोडजवळील उजनी डावा उजवा कालव्याच्या साईटपट्टीला रविवारी सकाळी उघडकीस आला. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय मारुती काळे (वय ५०, रा. शिराळ ता. माढा) असे मृत झालेल्याचे नाव आहे. हे खारी, टोस्ट बेकरीचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहितीनुसार संजय काळे हे काल शनिवारी सायंकाळी जेवण करून घराबाहेरील आपल्या अंगणात झोपले होते. शनिवार मध्यरात्री ते रविवार पहाटेच्या दरम्यान ते आपला छोटाहत्ती (एम एच ४५-६५७७ ) मालवाहतूक वाहन घेऊन, घरी कोणालाही न सांगता घराबाहेर पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज रविवारी सकाळी सात वाजता शेवरे (ता. माढा) येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्या लगत टेंभुर्णी – अकलूज रोड पासून आतमध्ये अंदाजे सहाशे फुट अंतरावर शेवरे येथील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना छोटा हत्ती वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आले. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. शरीराचे छातीपासून थोडा वरचा भाग शीर व एक हात शाबूत होता. बाकी शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्ञाने वार केलेल्या खूना डाव्या बाजूचा कान तुटल्यासह जखमा दिसून आल्या.

अकलूज-टेंभुर्णी रस्त्याच्या पूर्वेस उजनी कॅनॉलच्या भराव्याखाली छातीच्या खालचा भाग जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. या ठिकाणी टेम्पो ही पलटी केलेला होता. दरम्यान, मारेकऱ्यांनी त्यास ठार करून टेम्पोची स्टेफनी अंगावर टाकत मृतदेह पेटवून दिला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत तो टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. तेथे शिराळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. खुन कोणत्या कारणावरुन झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मृत काळे यांचा किरकोळ सावकारकीचाही व्यवसाय असल्याचे येथील नागरिकांतून चर्चा आहे तर असा इतका निर्दयपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून आरोपींनी टेंभुर्णी पोलीसांसमोर अवाहन उभे केले आहे.

मृतदेहाची विदारक स्थिती

मारेक-यांनी मयत संजय काळे याचा खून इतका क्रुरपणे केला आहे की, त्याचे फक्त एक हात आणि चेहराच फक्त ओळखता येत होता. चेह-यावर तीन वार करण्यात आले आहेत. यामध्ये त्याचा एक कान तुटला आहे. तर एक हात मिळून आला नाही तर तोंड धडापासून वेगळे झाले आहे. धडापासून खालचा भाग पूर्ण जळून खाक झाला आहे. हा खून अनैतिक संबधातून झाला असल्याचा संशयही व्यक्त आहे.