Home पंढरपूर भारत विकास परिषदेचे कार्य प्रेरणादायी : भालके

भारत विकास परिषदेचे कार्य प्रेरणादायी : भालके

281
0

भारत विकास परिषदेच्या जयपूर शिबिरात १२९ अपंगांना मिळणार कृत्रिम पाय,हात

पंढरपूर:- भारत विकास परिषदेचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही भगीरथ भालके यांनी दिली. भारत विकास परिषद पंढरपूर शाखेतर्फे अपंगांसाठी जयपूर फुट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात एकूण १८४ जणांनी नाव नोंदणी केली. या पैकी कृत्रिम हात – २५,कृत्रिम पाय – १०० आणि पोलीओ कॅलीपर्स ४ असे एकूण १२९ अपंगांना मोफत वाटप केले जाणार असल्याची माहिती भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी दिली आहे.
भारत विकास परिषदेच्या विविध उपक्रमातील एक विकलांग सहाय्यता योजने अंतर्गत,कृत्रिम पाय,हात व पोलिओ कॅलिपर चे मोफत वाटप करण्यात येणार आहे.गेल्या २५ वर्षात भारत विकास परिषदेने देशात ३०००००–(३ लाख) कृत्रिम पाय बसवून दिले आहेत.या महान,समाजोपयोगी कार्याबद्दल माननीय राष्ट्रपती कडून परिषदेला दोन वेळा गौरविण्यात आले आहे.पंढरपूर शाखेतर्फे दि.१ डिसेंबर रोजी अपंग शिबीर- कृत्रिम पाय,हात व पोलिओ कॅलिपरचे शिबीर येथील डॉ.काणे यांच्या गायत्री हायटेक हॉस्पीटल येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात भारत माता आणि स्वामी विविकानंद यांच्या प्रतिमा पूजन करून झाली.त्यानंतर परिषदेच्या स्वानंदी काणे आणि सौ चौंडावार यांनी वंदेमातरम गायले. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ वर्षा काणे यांनी तर सुत्रसंचलन मैत्रेयी केसकर यांनी केले. आभार सेवा प्रमुख डॉ अनिल पवार यांनी मानले. या वेळी भारत विकास परिषेदेचे उपाध्यक्ष वि.मा.मिरासदार,महावीर गांधी, डॉ पंकज गायकवाड, विश्वास पाटील,डॉ.मृणाल गांधी,डॉ वर्षा पाटील,विठ्ठल वाघोलीकर,मंदार लोहोकरे,सचिन बेणारे, नितीन रत्नपारखी,उज्वल दोशी आदी उपस्थित होते.
या वेळी भगीरथ भालके यांनी मनोगत व्यक्त करताना अपंगांसाठी करती असलेल्या कार्याचा गौरव केला. या कामी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबध राहू असे त्यांनी सांगितले. तर भारत विकास परिषदेच्या विकलांग सेवा प्रमुख विनय खटावकर यांनी सर्वप्रथम पंढरपूर शाखेचे अभिनंदन केले. येथील शाखा स्थापन होऊन अजून एक वर्ष पूर्ण होणे बाकी आहे. तरी या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला म्हणून सेवा प्रमुख डॉ पंकज गायकवाड,डॉ अनिल पवार आणि सुनील उंबरे यांचे अभिनंदन केले. परिषदेमार्फत देण्यात येणारी साहित्य हि उत्तम दर्जेची असणार आहेत अशी माहिती खटावकर यांनी दिली. तर या शिबिरात लाभार्थ्यांच्या पायाचे आणि हाताचे मोज –माप घेतले असून ते पुणे येथील परिषदेच्या विकलांग केंद्रातून बनवून येणार आहे.साधारपणे जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात याचे मोफत वाटप केले जाईल अशी माहिती भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे यांनी दिली.या शिबिरास काणे हॉस्पीटलचा स्टाफ तसेच परिषदेचे सोलापूर येथील श्रीकांत कुलकर्णी आणि आनंदराव कुलकर्णी तसेच पुणे येथील विकलांग केंद्रातील ४ तंत्रज्ञ याचे मोलाचे सहकार्य लाभले असे डॉ अनिल पवार यांनी सांगितले.