Home पंढरपूर ….. भालकेंची बॅटींग तर नागेश भोसलेंची बॉलिंग .

….. भालकेंची बॅटींग तर नागेश भोसलेंची बॉलिंग .

2080
0

पंढरपूर:- शहरात हॅट्रीक चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. राष्ट्रवादीचे नूतन आमदार भारत नाना भालके हे पंढरपूर मतदारसंघातून निवडून येण्याची हॅट्रीक साधली आहे . त्यांच्या सन्मानार्थ संजय ननवरे आणि सुमित शिंदे मित्रमंडळाच्या वतीने ह्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन युवकनेते भगीरथ भालके आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भगीरथ भालकेंनी नागेश भोसलेंच्या बॉलिंग वर जोरदार बॅटिंग केली. दोघांमध्ये रंगलेलल्या खेळाचा उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला .
महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणूकीत भालके , भोसले एकमेकांनच्या विरोधात प्रचारात होते. त्या राजकीय खेळानंतर आजच्या क्रिकेटच्या मैदानवर हे बॅटिंग आणि बॉलिंग करताना दिसले.

यावेळी सुमित शिंदे , संजूबाबा ननवरे , नगरसेवक महादेव धोत्रे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संदीप मांडवे, काँग्रेस जिल्हा सेक्रेटरी अध्यक्ष शंकर सुरवसे, समाजसेवक अनंत नाईकनवरे, संतोष बंडगर, दादा थेटे, नारायण उत्पात,प्रवीण सपनेकर,दिग्विजय राजमाने,योगेश बडवे, संजू काळे, समाधान पवार, महेश सगर, भारत वायदंडे,ज्योती वाघ सर, अजय कुमार, शुभम आष्टीकर,शैलेश वांगीकर, विशाल खंडागळे आदी उपस्थित होते.