Home पंढरपूर भालके कुटुंबाला डावलल्यास राष्ट्रवादीचा पराभव अटळ- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा इशारा...

भालके कुटुंबाला डावलल्यास राष्ट्रवादीचा पराभव अटळ- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा इशारा तर करमाळयाचे आमदार संजय मामा शिंदेंनी बोलणे टाळले.

2742
0

पंढरपूर:-राष्ट्रवादी काँग्रेसने भालके परिवार सोडून इतरांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिल्यास हा उमेदवार पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसला दिलाय.आज स्व. भारत नाना भालकेंच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आयोजित जनसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते.तर करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी बोलणे टाळल्याने सभेत उलटसुलट चर्चा सुरू झाली.

याप्रसंगी बोलताना प्रकाश पाटलांनी स्व. भालकेंच्या आठवणींचा उजाळा दिला.
स्व. आमदार भालके यांनी 2009 साली तात्कालिक उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनाचा पराभव केला होता. स्व. भालके हे जनतेशी नाळ जोडलेला नेता होता. त्यामुळे पंढरपुर-मंगळवेढा तालुक्यातील जनता आजही भालके कुटुंबाच्या सोबत आहे. काही भाजप नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासाठी काही मोठ्या शक्ती प्रयत्नशील असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
त्यामुळे राष्ट्रवादीने फक्त भालके कुटुंबातील सदस्यांलाच उमेदवारी द्यावी . काँग्रेस पक्ष रात्रंदिवस एक करून विजयश्री खेचून आणू असा शब्द त्यांनी दिला.
सकाळीची सुरवात जनतेच्या समस्या सोडवण्यापासून करावी असा सल्ला त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांना दिला.

या कार्यक्रमात करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी मात्र मनोगत व्यक्त करणे टाळल्याने भरसभेत उलटसुलट चर्चा सुरू झालीय.