Home महाराष्ट्र भीमप्रहार सामाजिक संघटनेच्या रोजनिशीचे लोकनायक आबासाहेब उबाळे यांचे जयंतीदिनी प्रकाशन.

भीमप्रहार सामाजिक संघटनेच्या रोजनिशीचे लोकनायक आबासाहेब उबाळे यांचे जयंतीदिनी प्रकाशन.

429
0

इंदापूर :- लोकनायक राजदत्त ऊर्फ आबासाहेब उबाळे यांच्या 64 व्या जयंतीनिमित्त भीमप्रहार सामाजिक संघटनेच्या प्रथम रोजनिशीचे अनावरन आणि लोकार्पण इंदापूर ग्रामीणचे पोलिस निरिक्षक श्री.एन.एस.सारंगकर यांचे हस्ते आणि डॉ.राजेश कांबळे, स.पो.नी.अजीत जाधव, पो.उप.नि.दाजी देठे, ठाणे अंमलदार श्री.फाळके यांचे प्रमुख उपस्थितीत आणि संघटनेचे मुख्य मार्गदर्शक आणि सोलापूर डेलीचे संपादक श्री.अभिराज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.


यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.भीमसेन उबाळे सर यांनी संघटनेचे धैर्य धोरणा बद्दलची प्रस्तावना केली. तसेच कार्यकर्ता व समाज यांचे संबंध कसे असावेत याबद्दल विस्ताराने मत मांडले.
तसेच पोलिस निरिक्षक श्री.सारंगकर यांनी रोजनिशी लिहायची असा संकल्प प्रत्येक तरूण आणि सुजाण नागरिक यांनी करावा असा मोलाचा सल्ला दिला. आणि रोजनिशीच्या उपक्रमाला शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले.
तसेच संघटनेचे मुख्य सल्लागार डॉ.राजेश कांबळे यांनी संघटनेचे उपक्रम, स्थापनेचे उद्दिष्ट सांगितले आणि उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष भीमसेन सर्जेराव उबाळे सर, संस्थापक सदस्य श्री योगेश एंवळे, श्री शिरीष कांबळे, श्री महेश एंवळे, श्री राहुल गोरे व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.