Home पंढरपूर भीमा नदी वरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्या. स्वाभिमानी शेतकरी...

भीमा नदी वरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांची मागणी

475
0

पंढरपूर:- उजनी धरणातून भीमा नदीत उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. या पाण्यातून नदीकाठची संपूर्ण शेती अवलंबून आहे याचा विचार करता नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नदीकाठच्या गावाच्या पिण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.
त्याचबरोबर यावेळी दुसरी एक मागणी करण्यात आली भीमा नदीतील अनेक बंधाऱ्यात पावसाळ्याचे पाणी काहीप्रमाणात साठवुन ठेवलेले आहे . त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून संपूर्ण दारे काढून अडवलेले पाणी सोडून न देता आवश्यक तेवढेच दारे काढून पाणी पुढे नेण्याची मागणी करण्यात आली.
भीमा नदीवर सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पाटबंधारे खात्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यशवंत बागल, प्रगतशील बागातदार संभाजी शिंदे, महादेव शिंदे-माने आदी शेतकरी उपस्थित होते.