Home सोलापूर मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूरला भोपळा, आमदार प्रणिती शिंदेंना वगळले .

मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूरला भोपळा, आमदार प्रणिती शिंदेंना वगळले .

2576
0

पंढरपूर- महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज सोमवारी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे.
सोलापूर जिल्ह्याला या विस्तारात भोपळा मिळाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातून राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालके, आमदार संजय शिंदे तर कॉंग्रेस कडून आमदार प्रणिती शिंदे यांची नावे आघाडीवर होती. सोलापूर जिल्ह्याला संधी न मिळाल्याने जिल्ह्यातून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान काँग्रेसच्या 10 नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आठ कॅबिनेट मंत्री तर दोघांना राज्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. यामध्ये अशोक चव्हाण, अमित देशमुख यांच्यासह 10 नेत्यांची वर्णी लागली आहे. मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचे नाव या यादीत नाही. यामुळे त्यांची मंत्रिपदाची संधी हुकल्याची चर्चा आहे.

काँग्रेसकडून अशोक चव्हाण, के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख या नेत्यांच्या गळ्यात कॅबिनेट पदाची माळ पडणार आहे. तर सतेज पाटील, विश्वजीत कदम राज्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र प्रणिती शिंदे यांची मंत्रिपदाची संधी यंदाही हुकली आहे.