Home पंढरपूर मराठा समाजाच्या आक्रोश मोर्चाची सरकारने घेतली धास्ती ; पंढरपूरात संघटनेच्या पदाधिकार्यांना आणि...

मराठा समाजाच्या आक्रोश मोर्चाची सरकारने घेतली धास्ती ; पंढरपूरात संघटनेच्या पदाधिकार्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रवेश बंदी.

765
0

पंढरपूर :- मराठा आरक्षणासाठी पंढरपूर ते मंत्रालय दिंडी आक्रोश मोर्चा काढणाऱ्या मराठा समाजाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश बंदी करण्यात आली. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे आदेश काढले आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.
७ नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मराठा समाज हा मंत्रालयाकडे कूच करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी अशी प्रमुख मागणी या आक्रोश मोर्चा द्वारे करण्यात येणार आहे. पंढरपूर बारामती पुणे मार्गे १९ दिवसांचा प्रवास करीत हा मराठा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.
मराठा समाजाच्या आक्रोश मोर्चाचे राज्य सरकारने चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.
मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पंढरपूरमध्ये येऊ नये यासाठी ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपर्यंत पंढरपूरला येणारी एसटी बसची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच ६ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबरच्या दरम्यान नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, प्रदक्षणा मार्ग, चौफळा या भागांमध्ये संचार बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तर 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. जिल्ह्यात तब्बल 31 हजार रुग्ण आढळून आलेत. तर तब्बल 968 प्रतिबंधित क्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये घोषीत करण्यात आले आहेत.
मराठा समाजाच्या आक्रोश मोर्चा साठी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते एकत्र येऊ शकतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण कायदा साथीचे रोग कायद्यानुसार अधिकाऱ्यांनी वरील आदेश दिले आहेत. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3)अन्वये मंदिर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय.
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात तब्बल 58 मूक मोर्चे काढले. ठिकाणी आंदोलने झाली. राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय.
प्रशासनाच्या या आदेशाविरुद्ध मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.