Home महाराष्ट्र मशीदींना हात लावल्यास याद राखा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचा इशारा.

मशीदींना हात लावल्यास याद राखा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचा इशारा.

1868
0

बांगलादेशी मुस्लीमांबद्दल राज ठाकरे यांची भूमिका दुटप्पी; सुधारित नागरिकत्व कायद्याशिवाय बांगलादेशी मुस्लिमांना हटविणार कसे ? केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई – मशिंदिंवरील भोंगे हटविण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे. राष्ट्रीय एकात्मतेला मारक भूमिका कोणी घेऊ नये. मशिंदीना हात लावल्यास भारतीय मुस्लिमांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीरपणे उभा राहील असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिला आहे.

बंगलादेशी,पाकिस्तानी, अफगाणिस्तानातील मुस्लिम गैरमार्गाने घुसखोरी करून देशात राहू शकत नाहीत. बांग्लादेशी मुस्लिमांबद्दल राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका दुटप्पी असल्याचे मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.बांग्लादेशी मुस्लिमांना देशाबाहेर काढण्यासाठी मनसे मोर्चा काढणार आहे. मात्र नागरीकत्व सुधारणा कायद्याला मनसे समर्थन करणार नाही. ही राज ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आहे. बांग्लादेशी मुस्लिमांना देशाबाहेर काढण्यासाठी नागरीकत्व सुधारणा कायदा आवश्यक आहे. हा कायदा केंद्र सरकार ने केला आहे. केंद्र सरकार ने चांगले काम केले आहे . चांगल्या कामाला पाठींबा देण्याची भारतीय संस्कृती आहे. मनसे ने सरकार ला पाठींबा देऊ नये मात्र केंद्र सरकारने केलेल्या चांगल्या कामाला पाठिंबा राज ठाकरे यांनी द्यावा; नागरिकत्व सुधारणा कयद्याला पाठिंबा द्यावा असे ना. रामदास आठवले म्हणाले.

बांद्रा येथील संविधान निवासस्थानी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ना.रामदास आठवले यांनी ही भूमिका मांडली.

नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नाही. पाकिस्तान; अफगाणिस्तान ; बांगलादेश; या देशांतील हिंदू ; बौद्ध; शिख ;ख्रिश्चन या त्या देशात अल्पसंख्य असणाऱ्या धर्मियांना मानवतेच्या दृष्टीकोनातून नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आहे .त्यात भारतीय मुस्लिमांच्या विरोधात कोणतेही षडयंत्र नाही. जर नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भारतीय मुस्लिमांचे नुकसान होणार असेल तर भारतीय मुस्लिमांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीरपणे उभा राहील. असा विश्वास ना रामदास आठवले यांनी मुस्लिम बांधवांना दिला आहे. भारतीय मुस्लिमांना नागरीकत्व कायद्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी भारत सरकार ने या कायद्याच्या सुधारनेसाठी सूचना ही मागविल्या आहेत अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.