Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि शहर ग्रामीण पत्रकार संघ इंदापूर...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि शहर ग्रामीण पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने फळझाड लागवड.

95
0

इंदापूर:- (भीमसेन उबाळे) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या माध्यमातून वडापुरी गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळालेल्या झाडांना, हे झाड म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य असून आपल्या मुलाप्रमाणे जपून ते झाड पूर्ण क्षमतेने वाढू द्या, आगामी काळात आनंद मिळेल असा आशावाद शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ, इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला पवार यांच्या हस्ते ‘२२ हजार वृक्ष लागवड’ संकल्पाच्या अंतर्गत शनिवार (ता.२४ ऑक्टोबर)रोजी फळझाडे लागवड करण्यांंत आली.त्यावेळी शर्मिला पवार बोलत होत्या.

इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे,पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे,प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाच्या वतीने इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,जेष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे,मुख्य सचिव सागर शिंदे,उपाध्यक्ष संदीप सुतार,जिल्हा संपर्क प्रमुख महेश स्वामी,तालुका संघटक भिमराव आरडे,उदयसिंह जाधव,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले,रामदास पवार, बाळासाहेब कवळे,गोकुळ टांकसाळे,सिने अभिनेते शिवकुमार गुणवरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे दत्तात्रय गवळी,सचिन खुरंगे,निखिल कणसे,भिमसेन उबाळे व प्रेस फोटोग्राफर राजेंद्र भोसले,त्याचबरोबर वडापुरी गावच्या सरपंच सौ.संगिता तरंगे,गावचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव जगताप,तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव तरंगे,डी एन जगताप,बँक ऑफ बडोदा चे मुख्य कॅशियर प्रफुल्ल कुमारे,दयानंद चंदनशिवे,संगिता पासगे,हरीभाऊ माने,आप्पासाहेब बंडगर,हनुमान व्यायाम शाळेचे वस्ताद किरण गोसावी, अक्षय बागल,प्रज्वल गोसावी,निलेश शेलार,ओम गोसावी,निखिल नारायणकर, विजय बागल,वनविभागाचे वनरक्षक संतोष गीते,वनपाल यु.एस.खारतोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना शर्मिला पवार म्हणाले की,वडापुरी गावातील गावकरी हे सामाजिक जाणिवेतून काम करतात.या कामाची दखल पत्रकार संघाने घेऊन या गावातील प्रत्येक कुटुंबाला फळझाड देण्याची भूमिका बजावली गेली.तसं पाहिलं तर हा परिसर दुष्काळी पट्ट्यातला आहे. परंतु यंदा पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे, शेतकऱ्यांचे, नागरिकांचे, गरीब कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे.खरेतर यातून सावरण्यासाठी वृक्षारोपण यासारखे उपक्रम गावांमध्ये यशस्वी राहून आनंद निर्माण केला गेला पाहिजे.गेल्या 13 ते 14 वर्षापासून,शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या हद्दीत व इतर भागात विहीरींचे खोलीकरण, जुन्या ओढयांचा काढलेला गाळ,तसेच जलसंधारणासाठी केलेली सामाजिक जाणिवेतून कामे, यामुळे असंख्य चांगल्या विचारांची माणसे जोडता आली.ही कामे पूर्ण झाल्याने आणखी होणारे लोकांचे नुकसान टळले आहे.त्यामुळे जलसंधारणाच्या कामांसाठी शरयू फाउंडेशन पुढेही काम करीतच राहणार आहे.अशी ग्वाही पवार यांनी दिली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले म्हणाले की,काटी – वडापुरी जिल्हापरिषदेच्या गटांमध्ये पत्रकार संघाच्या माध्यमातून जवळपास वृक्षारोपणासाठी सतरा गावांची निवड करण्यात आली आहे.त्यामुळे या गटामध्ये पत्रकार संघाचे वृक्षारोपण यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.महामारी आल्यानंतर,स्वतःच्या आरोग्यासाठी फळझाडे किती महत्त्वाचे असतात.ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाला कळाले आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने प्रत्येक कुटुंबांना फळझाड आपल्या अंगणात लावण्यासाठी दिल्याने आगामी काळात चांगली फळे चाकता येणार आहेत.या 22000 हजार फळझाड वृक्षारोपणामुळे आदर्श कुटुंब व्यवस्था निर्माण होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार साठे यांनी केले. प्रस्ताविक तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले तर, आभार रामदास पवार यांनी मानले.