Home महाराष्ट्र महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांची टीका.

महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांची टीका.

846
0

पंढरपूर :- महाविकासआघाडीच्या शपथविधीला अवघे दोन तास उलटण्याच्या अगोदरच राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर टीका केली आहे. फेसबुक पोस्ट टाकत त्यांनी ही टीका केली आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मंत्रीमंडळाची बैठक बोलवली आहे. ही बैठक सुरु असतानाच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका करण्यास सुरवात केली आहे.

विरोधीपक्षनेते फडणवीसांची फेसबुक पोस्ट

महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा केल्या आहेत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र हे विभाग विकासाचुअअ वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिले आहेत. त्या भागांचा साधा उल्लेख देखिल महाविकासआघाडीने केला नाही हे दुर्दैव आहे असा आरोप त्यांनी केलाय. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल असी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.