Home पंढरपूर महिला तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. तिघांवर गुन्हा दाखल .

महिला तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. तिघांवर गुन्हा दाखल .

1180
0

पंढरपुरच्या तहसिलदर वाघमारे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

पंढरपूर :- येथील भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसिलदार वैशाली वाघमारे यांच्यासह पथकातील कर्मचाºयांच्या अंगावर गाडी घालून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न वाळु चोरांनी केला आहे. ही घटना २१ जुलै रोजी साडे अकराच्या सुमारास सांगोला जँकवेल परिसर (पंढरपूर ता. पंढरपुर जि सोलापुर) घडली आहे.

तहसिलदार वैशाली वाघमारे या तलाठी मुसा मुजावर, कैलास भुसिंगे व प्रशांत शिंदे यांच्यासह अवैद्य वाळु उपसा व वाहतूक होत असलेल्या भीमा नदीपात्रातील जॅकवेल परिसरात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या व त्यांच्या पथकातील कर्मचाºयांच्या अंगावर व त्यांचे ताब्यातील वाहनांवर देखील बिगर नंबरची वाहने घालून दुखापत करण्याच व जिवाला धोका होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी आण्णा पवार, ग्यानबा धोत्र व भैय्या उर्फ प्रकाश गंगथडे यांच्या विरुध्द शहर पोलीस ठाण्यात  भा.दं.वि.कलम ३०७ ३५३, ३३२, ३७९, ५०६, ३४ पर्यावरण संरक्षण कायदा क. ९ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोनि. अरुण पवार यांनी दिली.