Home पंढरपूर माजी आमदार दीपक आबा साळुंखेंसह तीस जणांवर गुन्हा दाखल.

माजी आमदार दीपक आबा साळुंखेंसह तीस जणांवर गुन्हा दाखल.

8650
0

पंढरपूर:- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आदेश देण्यात आले. जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यायत आली. असे असताना पाण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्याप्रकरणी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटलांसह तीस जणांवर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबद्दल पोलिसात दाखल गुंह्यानुसार माहिती अशी की, ८ एप्रिल रोजी टेंभूचे उन्हाळी आवर्तनाचे चाचणीसाठी सोडण्यात येणारे पाणी प्राधान्याने जवळा आणि परिसरात सोडावे यामागणी साठी माजी आमदार साळुंखे पाटलांनी सय्यद बाबा मठ , सोनंद , बुरुंगेवाडी , जवळा आदी ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. तर जवळ्याचे माजी उपसरपंचांनी जमाव जमवून आलेल्या पाण्याचे पूजन केले. यावेळी वरिल मंडळींनी मोठ्या प्रमाणात जमाव जमा केला, सोशल डिस्टंसिंगचे देखिल पाळन केले नाही. जिल्हाधिकार्यांचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, विजयकुमार देशमुख, सुनिल साळुंखे, सतिश काशीद, महादेव पाटील, प्रकाश काशिद , साहेबराव काशीद, दीपक काशिद, राजाराम काशिद, तानाजी काशिद , संभाजी काशिद, अंकुश कोळी, बाळासाहेब कोळी, सुभाष बावधने, श्रीमंत बुरुंगे, संतोष शेटे, गणेश माने, सुभाष बुरुंगे , नितीन बुरुंगे, मोहन बुरुंगे, तसेच पाणी पूजन केल्या प्रकरणी माजी उपसरपंच आप्पासाहेब देशमुख, संजय साळुंखे , वैभव देशमुख, नवनाथ बुरुंगे, प्रशांत साळुंखे यांच्यावर पो.ना. संजय चंदनशिवे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भा.द.वि. १८८,२६९,२७०, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब), महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ३७(३) १३५,साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम २,३, ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आजी – माजी लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्याची ही सोलापूर जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. तर सांगोला तालुक्यातील दुसरी मोठी घटना आहे. पंढरपूरमध्ये भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल आहे.