Home महाराष्ट्र सुटकेस मध्ये सापडले मानवी देहाचे तुकडे .

सुटकेस मध्ये सापडले मानवी देहाचे तुकडे .

1713
0

पंढरपूर:- सोमवरी संध्याकाळी मुंबईच्या माहिम बीचवर एका सुटकेसमध्ये शरीराचे तुकडे सापडले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. माहिम बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या लोकांच्या ही बाब लक्षात आली आणि तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.
हे सुटकेस समुद्रातून वाहून आल्य़ाचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, या सुटकेस मध्ये उजवा पाय आणि डावा हात सापडला तर शरीराचे इतर भागही सुटकेमध्ये सापडले आहेत. नागरिकांनी गजबजलेल्या ठिकाणी असं मानवी शरीर कापून ठेवलेलं सुटकेस सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी सायन नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सापडलेल्या शरीराच्या तुकड्यांमध्ये संपूर्ण मृतदेह नसून त्यात शरीराचे अर्धेच भाग आहेत. त्यामुळे मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात मृतदेहाचे इतर भाग शोधण्याचं काम सुरू आहे.