Home पंढरपूर मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्यासाठी मानाचा वारकरी ठरला.

मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्यासाठी मानाचा वारकरी ठरला.

1331
0

पंढरपूर :- आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मानाचा वारकरी ठरला असून मंदिरात वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे (वय- ८४ रा. चिंचपूर पांगुळ जिल्हा – नगर) यांना मान मिळाला आहे.
यंदा कोरोना महामारीमुळे आषाढी यात्रा रद्द करण्यात आलीय. एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. वारीच रद्द झाल्याने मानाचा वारकरी कोण असणार याकडे राज्यातील भाविकांचे लक्ष लागले होते. मंदिर समितीने बैठक घेवून मानाचा वारकरी ठरवला आहे.
विठ्ठल बढे हे मंदिर वीणेची सेवा देतात. त्यांना हा मान देण्यात आलाय. बढे आता मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करणार आहेत.
सफाई कामगाराला मानाचा वारकरी करा अशी मागणी नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी केली होती. तर शेतकरी संघटनेने शेतकऱ्याला मान देण्याची मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्या अमान्य करीत समितीने विठ्ठलाची अखंड सेवा करणाऱ्या वारकऱ्याला ही संधी दिलीय.