Home पंढरपूर सोलापूरातील “या” नेत्याला आमदार करा. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार शरद पवारांची भेट...

सोलापूरातील “या” नेत्याला आमदार करा. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार शरद पवारांची भेट .

3764
0

पंढरपूर :- राज्यात आता सेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. सरकार येणार म्हणाल्यावर राज्यातील या तीनही पक्षाच्या निष्ठावंतांनी मंत्रीपदासाठी आणि आमदारकी साठी लॉबींग करण्यास सुरवात केली आहे. मोहोळच्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे एकनिष्ठ मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागावी आणि त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घ्यावे अशी मागणी केली आहे.
आज मोहोळचे आमदार यशवंत माने, बाळराजे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पवारांची भेट घेवून ही मागणी केली आहे.


भाजपच्या सत्ताकाळात राष्ट्रवादी अनेक नेते सोडून गेले. सोलापूर जिल्ह्यातून देखिल विजयसिंह मोहिते पाटलांसारख्या दिग्गज नेत्याने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. मात्र राजन पाटील हे पवारांशी एकनिष्ठ राहिले. त्यांचा हक्काचा मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्याने ते १० वर्ष सत्तास्थाना पासून दुर आहेत. मोहोळ मधून पक्षाने दिलेला उमेदवार प्रामाणिकपणे निवडून आणण्याचे काम राजन पाटलांनी तिसऱ्यांदा केले आहे. आजपर्यंत त्यांनी पक्षाकडे कशाचीच अपेक्षा केली नाही. मोहोळ तालुक्यात अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा गड राखला. त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना विधानपरिषदेवर घेण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे.