Home महाराष्ट्र राज्यातील शासकीय महामंडळाच्या नियुक्त्या रद्द.

राज्यातील शासकीय महामंडळाच्या नियुक्त्या रद्द.

2176
0

पंढरपूर :- तेराव्या विधानसभेचा कालावधी संपल्याने राज्यातील शासकीय महामंडळाच्या नियुक्त्या देखिल रद्द करण्यात आल्या आहेत. तेराव्या विधानसभेचा कालावधी शनिवार संपुष्टात आला आहे.
राज्यात जवळपास १०० पेक्षा जास्त महामंडळे आहेत. या महामंडळांवर सत्ताधारी पक्ष राजकीय नियुक्त्या करीत असतो. विधानसभेला तिकीट न मिळालेले, मंत्रीमंडळात संधी न मिळालेले, रुसलेले, फुगलेले, त्या त्या विभागातील वजनदार नेते, मित्र पक्षाचे नेते यांचे पुर्नवसन करण्यासाठी त्यांची महामंडळावर नियुक्ती केली जाते.
म्हाडा, सिडको, एस टी महामंडळ, कृष्णा खोरे, उर्वरित महाराष्ट्र, महात्मा फुले , आण्णाभाउ साठे, आण्णासाहेब पाटील, आर्थिक दुर्बल महामंडळ अशी अनेक महामंडळे आहेत. यांच्या अध्यक्ष, चेअरमनच्या निवडी सरकार करते.
विधानसभेचा कालावधी संपल्याने आता ह्या नियुक्त्या देखिल रद्द झाल्या आहेत.