Home ताज्या बातम्या युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी मेहबुब शेख

युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी मेहबुब शेख

217
0

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मेहबुब शेख यांची तर कार्याध्यक्षपदी सुरज चव्हाण व रविकांत वरपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संग्राम कोलते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बीडच्या मेहबूब शेख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांनी नवनियुक्ती केली. याचसोबत सुरज चव्हाण आणि रविकांत वरपे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

नवनियुक्त पदाधिकारी पक्षवाढीसाठी अत्यंत रचनात्मक योगदान देतील अशी आशा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here