Home पंढरपूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना हिंदू धर्मियांच्या कार्यक्रमांना बोलवू नका , कट्टर...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना हिंदू धर्मियांच्या कार्यक्रमांना बोलवू नका , कट्टर हिंदू राज्यकर्त्यांनाच बोलवा – ह.भ.प . निवृत्ती महाराज वक्तेंचे आवाहन.

7766
0

पंढरपूर :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे नास्तिक आहेत. ते देव-धर्म मानत नाहीत. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना धार्मिक व्याख्यानाला बोलवू नका असे आवाहन ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांनी पत्रकाद्वारे केलय. वक्ते महाराज हे राष्ट्रीय वारकरी परिषदेचे संस्थापक आहेत.
वक्ते महाराजांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये त्यांनी हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कट्टर हिंदू राज्यकर्त्यांना धार्मिक कार्यासाठी बोलवण्याची सुचना केलीय.
खासदार पवारांना रामायण मान्य नाही, मुख्यमंत्री असताना ते कधीच श्री विठ्ठलाच्या महापुजेस हजर राहत नव्हते. समर्थ रामदास स्वामींचा ते एकेरी उल्लेख करतात. जगतगुरू संत तुकाराम वैकुंठाला गेले नाहीत, संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली नाही. असे लेख लिहणार्या पुरोगाम्यांना त्यांचा पाठिंबा असतो. त्यामुळे स्वा. सु नि सदगुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्ताने अशा नास्तिक व्यक्तीस बोलावणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत पवारांना थेट विरोध केलाय.
व्यक्तीनिष्ठा, पक्षनिष्ठा यापेक्षा ईश्वरनिष्ठा महत्वाची आहे. पैशाच्या लालसेपोटी जर अशा मंडळीना कोणी बोलावत असेल तर तो अधर्मच आहे अशा शब्दात वक्ते महाराजांनी संयोजक मंडळींनी सुनावले आहे.
यापूर्वी पवारांना दिलेल्या प्रभुणे पुरस्कारवरुन वा.ना उत्पातांनी देखिल टीका केली होती.
ह.भ.प वक्ते महाराजांच्या या भूमिकेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.