Home Uncategorized ‘लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, मग संसार नीट कसा होईल?’

‘लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, मग संसार नीट कसा होईल?’

1033
0

 

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी कोण पुढाकार घेणार भाजपा की शिवसेना हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कारण महायुतीला जनमताचा कौल मिळाला असला तरीही मुख्यमंत्री कोण होणार यावर सगळे घोडे अडले आहे. अशात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून सरकारवर टीका केली आहे. लग्न ठरवण्याच्या बैठकीतच एवढी भांडणं होत आहेत तर मग संसार नीट कसा होईल असं म्हणत रोहित पवार यांनी ही पोस्ट लिहिली आहे. सरकार स्थापनेला होत असलेल्या उशिरामुळे एक नागरिक म्हणून मी चिंतेत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.