Home महाराष्ट्र “बारामती” ने अखेर फडणवीसांना “वर्षा” सोडण्यास भाग पाडले. सामान भरण्यासाठी वर्षावर...

“बारामती” ने अखेर फडणवीसांना “वर्षा” सोडण्यास भाग पाडले. सामान भरण्यासाठी वर्षावर “बारा” कर्मचारी दाखल .

582
0

पंढरपूर :- मी पुन्हा येईन , मी पुन्हा येईन असे म्हणत देवेंद्र फडणवीस तीन दिवसांसाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले खरे. मात्र अजित दादांनी राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार कोसळले. महाविकासआघाडीने उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा फडणवीसांना सोडावे लागणार आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी वर्षावरील मुक्काम तीन महिन्यांनी वाढवून घेतला होता. त्यानंतर अजित दादांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि तीन दिवसांनी राजीनामा दिला.
आता उध्दव ठाकरेंचा पत्ता हा वर्षा निवासस्थान होणार आहे. त्यामुळे अखेर फडणवीसांनी वर्षावरील आपले सामान गुंडाळण्यास सुरवात केली आहे. आज हे सामान घेवून जाण्यासाठी टेंपो वर्षावर दाखल झाला आहे. ज्या बारामती मुळे फडणवीसांना वर्षा सोडावे लागले. तो “बारा” हा शब्द फडणवीसांची पाठ सोडण्यास तयार नाही असे दिसत आहे. कारण फडणवीसांचे सामान “बारा” कामगार गुंडाळत आहेत. महाविकासआघाडी उद्यास आल्यापासून सोशल मिडियावर फडणवीसांच्या परत जाण्यावरुन मिम्स व्हायरल होत होते. आज अखेर फडणवीसांनी आपले सामान गुंडाळले आहे. फडणवीस लवकरच विरोधी पक्ष नेत्याच्या बंगल्यात जाणार आहेत .