Home पंढरपूर वाचा कुठे उभारला जातोय माता रमाईंचा पुर्णाकृती पुतळा.

वाचा कुठे उभारला जातोय माता रमाईंचा पुर्णाकृती पुतळा.

681
0

पंढरपूर:- सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाईंचा पुर्णाकृती उभारला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारी हा पुतळा उभारला जाणार असल्याची माहिती वंचितचे राज्य प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली आहे.
न्यू बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळा बसविण्यास व नियोजित जागेची खास पाहणी करण्यासाठी आज पुणे येथील अल्हाट स्टुडिओचे श्री.सुभाष अल्हाट यांनी सोलापूरमध्ये येऊन पाहणी केली. उद्यान मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची एवढा माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बनविण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षात माता रमाईंचे मोठे योगदान आहे. बाबांच्या प्रत्येक लढ्यात रमाई त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिल्या. त्यांच्या संघर्षाची कहाणी पुढच्या पिढीला कळावी आणि त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा यासाठी बाबांच्या पुतळ्या शेजारी माता रमाईंच्या पुतळा बसविला जाणार असल्याचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद दादा चंदनशिवे,चाचा सोनवणे, सुरज गायकवाड, दीपक इंगळे, इंजिनीयर बाबा कसबे, मनपा अधिकारी मुजावर, राहुल म्हेत्रे, लोकापुरे, उद्यानचे कर्मचारी मल्लिनाथ तूपसाखरे, गायकवाड आदी उपस्थित होते