Home पंढरपूर विद्यमान शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत खोटारडे- गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचा टोला

विद्यमान शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत खोटारडे- गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचा टोला

970
0

सहा वर्षे आमदारकी भोगलेल्या सावंतांनी शिक्षकांचा दिशाभूल करू नये .

पंढरपूर :- शिक्षकांच्या जीवावर सहा वर्षे आमदारकी भोगलेल्या दत्तात्रय सावंत यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पाठिंबा असल्याची खोटी माहिती सांगून शिक्षकांची दिशाभूल करू नये. निवडणूक जिंकण्यासाठी असा खोटारडेपणा करणारा उमेदवार शिक्षकांशी किती प्रामाणिक असेल याचा ही विचार केलेला बरा असा, टोला गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी आज येथे लगावत आमदार सावंताच्या दाव्यातील हवाच काढून घेतली.
शिक्षक आणि पदवीधर निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथील विठ्ठल हाॅस्पिटल येथे काॅग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यावर टीका केली.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले राज्यात महाविकास आघाडी एकसंघपणे काम करत आहे. राज्यातील विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल.

अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच ते मनभेद करू लागले आहेत. ज्या विश्वासांनी त्यांना आमदार केले होते. तो विश्वास त्यांनी गमावला आहे.शिक्षकांमध्ये आणि पक्षा पक्षा मध्ये दुही निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. परंतु शिक्षकांनी त्यांची धुर्त खेळी ओळखली आहे. सर्व शिक्षक मतदार आणि नेते महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठाम आहेत. शिक्षक मतदार संघातून जयंत आसगावकर यांचा विजय निश्चित असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
2014 साली चंद्रकांत दादा पाटलांना आमदारकीची लॉटरी लागली होती. त्यावेळी आम्ही निवडणूकीकडे लक्ष दिले नाही. चंद्रकांत दादा आठव्या, नवव्या फेरीत निवडून आले. आता पुण्यासह राज्यातील पाचही जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकदिलाने काम करत आहे.
बैठकीला राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,काॅग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील (पानीवकर) तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले, संदीप मांडवे, आर.डी.पवार,अॅड. शहराध्यक्ष राजेश भादुले,चारूशिला कुलकर्णी आदी उपस्थित होते.