Home महाराष्ट्र शिवसेना नेते खासदार संजय राऊतांच्या जीविताला धोका. सुरक्षेत वाढ .

शिवसेना नेते खासदार संजय राऊतांच्या जीविताला धोका. सुरक्षेत वाढ .

1268
0

पंढरपूर:- शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या जिवीताला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गृह विभागाच्या अहवालानंतर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संजय राऊत यांना वाय सुरक्षा देण्यास आली आहे.
राज्य विधानसभेचा निकाल लागल्यापासून राऊत हे कमालीचे आक्रमक पहायला मिळाले. तसेच ते राज्यसभेत देखिल आक्रमकपणे आपले मुद्दे मांडत असतात. त्यांनी 370कलम हटवल्यानंतर राज्यसभेत भाषण केलं होतं. त्या भाषणात चे पडसाद पाकिस्तानात उमटले होते. त्यांच्या बोलण्याचे पडसाद नेहमीच राजकारणात आणि समाजकारणात उमटत असतात.