Home पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचा चेअरमनच होणार पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा आमदार

श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचा चेअरमनच होणार पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा आमदार

340
0

पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदी आमदार पुत्र भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हाच पंढरपूरचा आमदार हा इतिहास आहे. त्यामुळे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हेच त्यांचे राजकीय वारस देखील असणार हे आता सिद्ध झालय.

आज सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत सर्व संचालकांनी बहुमताने भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड केली . स्वर्गीय आमदार भारत नाना भालके हे 2002 पासून विठ्ठल सहकार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून धुरा सांभाळत होते. त्यांच्या अकाली जाण्याने कारखान्याचे चेअरमन पद रिक्त झाले होते. आज झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत यांना म्हणून निवडून देण्यात आले. कारखाना आर्थिक अडचणीत आल्यामुळे 2019 -20 चा गाळप हंगाम बंद ठेवण्यात आला होता. यामुळे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांना विरोधकांच्या अनेक आरोपांना तोंड द्यावे लागले होते. मात्र कोरोना महामारी सारख्या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी सरकार कडून कारखान्याला आर्थिक मदत मंजूर करून घेतली. आणि कारखान्याचे गाळप सुरू केले. याच दरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि आणि कोरोनावर मात करून सुद्धा आपल्या जुना आजारामुळे भालके यांचे निधन झाले. नूतन चेअरमन भगीरथ भालके यांच्या समोर देखील कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान आहे.

आमदार भालके यांच्या निधनानंतर वडीलकीच्या नात्याने राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्यांमध्ये विशेष लक्ष घातले आहे . शरद पवारांनी 18 डिसेंबर रोजी भालके कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती याच भेटीदरम्यान सर्व संचालकांना भगीरथ भालके यांना चेअरमन करण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या होत्या. 2021 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे.