Home पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाईचे साखर सहसंचालकांचे आदेश. कारखान्याच्या मालमत्तेचा होवू...

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाईचे साखर सहसंचालकांचे आदेश. कारखान्याच्या मालमत्तेचा होवू शकतो लिलाव!

2960
0

पंढरपूर:- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश साखर सहसंचालकांनी सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांना दिल्याने आमदार भारत भालकेंना मोठा धक्का मानला जात आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे. कारखान्याने २०१८-१९ ची एफ आर पी थकित आहे. शेतकऱ्यांचे तब्बल ५ कोटी ७९ लाख कारखान्याने उस बील दिले नाही. याविरोधात कारखान्याचे संस्थापक कै. कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील याचे नातू अमरजीत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर सहसंचालक पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवर सहसंचालकांनी हे आदेश दिले आहेत. रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आर आर सी) अक्टनुसार ही कारवाई होणार आहे. यामध्ये कारखान्यांच्या मालमत्तांचा लिलाव करुन शेतकऱ्यांची देणी देण्याची तरतूद आहे. सध्या श्री विठ्ठल कारखाना तालुक्याच्या राजकारणाचे आणि आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलाय. त्यामुळे आमदार भालके विरोधकांना या कारवाईच्या आदेशाने हत्तीचे बळ मिळाले आहे. आता सत्ताधारी आमदार भालके यावर काय करतात याची उत्सुकता तालुक्यात लागली आहे.