Home महाराष्ट्र ……. हा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान – खासदार शरद पवार

……. हा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान – खासदार शरद पवार

399
0

पंढरपूर:- राज्यातील सत्ता पेचावर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे. यामध्ये फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच सर्व घडामोडींचे लाईव्ह चित्रीकरण करण्यात यावे, गुप्त मतदान घेता येणार नाही असे आदेश न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे महाविकासआघाडीने स्वागत केले आहे.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी या निर्णयाचे स्वागत करताना ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मुल्यांची जपणूक केल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
तसेच हा निकाल योगायोगाने संविधान दिवस साजरा होताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकयांचा सन्मान झाला. याचा आनंद आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी आदरांजली वाहीली आहे.