Home महाराष्ट्र समाजसेवक उदय सर्वगोड जागतिक मानवाधिकार भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने...

समाजसेवक उदय सर्वगोड जागतिक मानवाधिकार भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

454
0

मुंबई: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येणाऱ्या समाजसेवक लायन्स उदय ज्ञानू सर्वगोड यांना मुंबईतील बोरीवली इथल्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात तिसऱ्या जागतिक प्रतिभा महासंमेलनाच्या निमित्ताने आयोजित पुरस्कार सोहळ्यांमध्ये भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जागतिक मानवाधिकार संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष लायन्स शंकर शेट्टी , हॉटेल रेस्टॉरंट फेडरेशन असोसिएशनचे माजी अध्यक्ष लायन्स संतोष शेट्टी,जागतिक मानवाधिकार बहरीनचे अध्यक्ष लीलाधर बाईकामडे,महासचिव डॉ. ए. एस. रासनकुटे आणि भाऊराव तायडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यापूर्वीही उदय सर्वगोड यांना सेव्हन वंडर्स पब्लीकेशनच्या वतीने आयोजित शिर्डी येथे आयोजित १२ व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात ‘राष्ट्रीय समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते

उदय ज्ञानू सर्वागोड हे मागील अनेक वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्रभरात सामाजिक सेवेचा वसा घेऊन कार्य करीत आहेत त्यांच्या आजवरच्या निस्वार्थ सेवेचा गौरव म्हणून त्यांना जागतिक मानवाधिकार महासंमेलनात सन्मानित करण्यात आले हा खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक सेवेचा गौरव म्हणता येईल

नागोराव तायडे आणि मंजू सराटे यांनाही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल भारतरत्न डाँ ऐ पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.