Home महाराष्ट्र राज्यात कोणाला दहशत वाटेल असे वातावरण असणार नाही- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

राज्यात कोणाला दहशत वाटेल असे वातावरण असणार नाही- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

579
0

पंढरपूर :- शपथविधी नंतर राज्य मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक सह्याद्री अतिथिगृहावर पार पडली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, नितीन राऊत, जयंत पाटील याच्यासह आमदार अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, आदी उपस्थित होते.
बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेची सुरवातच मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यात कोणाला दहशत वाटेल असे वातावरण असणार नाही अशी ग्वाही दिली.
या बैठकीत पहिला निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपये मंजूर करुन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
राज्यात पहिल्यांदा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ पडलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुन्हा शेतकरी नेटाने उभा करायचा असल्यास त्याला मोठी मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध योजनांची माहिती दोन दिवसात सादर करण्याच्या सुचना दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्रातील मोदी आणि गत फडणवीस सरकारने केलेली कर्ज माफी शेतकऱ्यांना मिळालीच नाही. तसेच पिक विम्याचा देखिल फायदा झाला नसल्याचा आरोप केला.