Home पंढरपूर सांगोल्याजवळ भीषण अपघात ५ वारकरी ठार .

सांगोल्याजवळ भीषण अपघात ५ वारकरी ठार .

2433
0

सांगोला:- कार्तिकी एकादशीला पंढरपूरला आलेल्या वारकऱ्यांच्या वाहनाला सांगोल्यानजिक मांजरी गावाजवळ भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातामध्ये ५ वारकरी भाविक मयत झाल्याची भीती व्यक्त होत आहे. हे भाविक कर्नाटकातील आहेत. पिकअप वाहनाची ट्रॅक्टरला धडक बसल्याचा अंदाज आहे.हे वारकरी बेळगाव जिल्ह्यातील असून ते कार्तिकी एकादशीला पंढरपूरकडे निघाले होते.
कृष्णा वामन कणबरकर (वय 46,) यल्लाप्पा देवाप्पा पाटील चालक ( वय 37 ),अरुण दत्तात्रय मुतकेकर (वय 34),लक्ष्मण परसराम आंबेवाडीकर ( वय 46), व महादेव मल्लाप्पा कणबरकर ( वय 40 , सर्व राहणार मंडोळी जि. बेळगाव) हे पाच जण जागीच ठार झाले आहेत. गणपत यल्लाप्पा दळवी (वय 70,) तमंन्ना नारायण साळवी (वय 48) गुंडू विठ्ठल तरळे (वय 72), परसराम गणपत दळवी (वय 32 )चार जखमीवर पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील मंडोळी गावचे भाविक हे खासगी पिकअपने पंढरपूरला यात्रेसाठी निघाले होते. मांजरी नजिक पहाटे ४ वाजता पिकअपची ट्रॅक्टरला धडक बसली. यामध्ये ५ वारकरी ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.