Home महाराष्ट्र सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि स्व. बाबासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला.

सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि स्व. बाबासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला.

163
0

इंदापूर :- स्वाभिमान युवा संमेलन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त(शनिवार) ता.23 रोजी इंदापूर तालुक्यातील मौजे शिरसटवाडी येथे शिवसंग्राम व्याख्यानमालेचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते उपस्थितीत होते.व्याख्यांते मा.भास्करराव पेरे -पाटील यांनी “माझी ग्रामपंचायत,माझी जबाबदारी” यांवर प्रबोधन करताना आपल्या अतिशय साध्या परंतु ग्रामीण शैलीमधे उपस्थितांचे गावच्या विकासासाठी विविध गोष्टीरुपाने प्रबोधन केले. त्यात त्यांनी वृक्षारोपण, ग्रामस्थांच्या अडचणी, अर्थनिती,जलसंधारण, या विविध विषयांवर चर्चा करत “कष्ट करा अन मानसात देव ओळखा” असा मौलिक संदेश त्यांनी दिला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर वकील बार असोशियशन अध्यक्ष अँँड.प्रमोदजी खरात, सामजिक कार्यकर्ता अमर बोराटे, भीमसेन उबाळे,सोमनाथ ढोले,प्रविण साबळे,अस्लम शेख, तसेच सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार आयोजक अँड.नितिन कदम यांनी केले तसेच सुत्रसंचालन साळुंखे यांनी केले .