Home पंढरपूर सोनकेत लाखो रूपयांची हातभट्टी दारू जप्त; उपअधिक्षक विक्रम कदमांची धडाकेबाज...

सोनकेत लाखो रूपयांची हातभट्टी दारू जप्त; उपअधिक्षक विक्रम कदमांची धडाकेबाज कारवाई.

709
0

पंढरपूर:- पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलिकडच्या काही दिवसांमध्ये दारू,मटका,जुगार, भुरट्या चोर्या, वाळू चोरी या सारख्या अवैध धंद्यामध्ये वाढ झाली असल्याच्या वारंवार तक्रार करून ही अशा धंद्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता थेट नव्याने उपअधिक्षक म्हणून रूजू झालेले विक्रम कदम यांनी अशा अवैध धंद्या विरोधात कडक पाऊले उचलली आहेत.
उपअधिक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी सोनके येथे हातभट्टी अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. कारवाई मध्ये 1 लाख 23 हजार 450 रूपये किंमतीची 17 बॅरल (5300 लिटर) दारू जप्त केली आहे.

सोनके भागात हातभट्टी दारू तयार करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार बुधवारी (ता.11) रात्री सोनके तलावा जवळ दिलीप गायकवाड यांच्या उसाच्या शेतात वीजेच्या खांबावरून चोरून वीज घेऊन हातभट्टी तयार करण्यात येत होती.
या ठिकाणी गुळ मिश्रीत व इतर घातक रसायने मिसळून हातभट्टी दारू तयार करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांची धाड पडल्याचे लक्षात येताच संशयित आरोपी दिलीप कृष्णा गायकवाड आणि मोहन अनिल दिघे (रा. सोनके ता. पंढरपूर ) हे पळून गेले. कारवाई दरम्यान
पोलिसांनी हातभट्टी उध्दवस्थ करून सर्व साहित्य जप्त केले आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी गायकवाड आणि दिघे यांच्या विरोधात पोलिसांनी पहिल्यांदाच भादंवि 328 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कारवाई मध्ये पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे,उपनिरीक्षक मैनुद्दीन खान,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कांबळे, पोलिस हेड काॅन्स्टेबल आनंता शिंदे,पोलिस नाईक मोहसीन सय्यद,रसीद मुलाणी,अंकुश नलवडे यांच्या पथकाने कारवाई केली.