Home पंढरपूर सोलापूरात कोरोनाचा पहिला बळी.

सोलापूरात कोरोनाचा पहिला बळी.

13423
0

पंढरपूर :- सोलापूर शहरात कोरोनाचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक बाब पुढे आलीय. गेली अनेक दिवस सोलापूर जिल्हा कोरोना मुक्त होता. कोणताही संशयित न सापडता थेट मयतच कोरोना बाधीत निघाल्याने एकच खळबळ माजलीय. आज जोडबसवन्ना चौकातील एका प्रार्थनास्थळाजवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती पुढे येत आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तात्काळ जोडबसवन्ना चौक सील केला आहे. सदर व्यक्तीचे किराणा दुकान असल्याचे समजते. संबंधित भाग १४ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरु केली आहे.