Home पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल विक्री बंद – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांचे आदेश

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल विक्री बंद – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांचे आदेश

8561
0

पंढरपूर :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असताना देखिल नागरिक मोठ्याप्रमाणात बाहेर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाने आता पेट्रोल, डीझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तसे आदेश दिले आहेत.
अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून हा निर्णय सर्वांना लागू असणार आहे. आज २५ मार्चच्या मध्यरात्री पासून ३१ मार्च पर्यंत हा निर्णय लागू राहिल.
जिल्हातील नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढत असल्याने आता प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याचे ठरविले आहे. या पेट्रोल, डीझेल विक्री मधून शेती, प्रक्रिया उद्योग, जीवनावश्यक मालाची वाहतूक, दुध, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे.