Home महाराष्ट्र सोलापूर पोलिसांची कर्नाटकात जावून गुटखा रॅकेटवर मोठी कारवाई. तब्बल १ कोटी ३८...

सोलापूर पोलिसांची कर्नाटकात जावून गुटखा रॅकेटवर मोठी कारवाई. तब्बल १ कोटी ३८ लाख ३७ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त .

1409
0

सोलापूर:- सोलापूर शहर पोलिसांनी गुटका रॅकेट वर मोठी कारवाई केली आहे. थेट कर्नाटक मध्ये जाऊन ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 1 कोटी 38 लाख 37 हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करत असताना जुना तुळजापूर नाका येथे एक संशयास्पद ट्रक ( KA 38- 7075) आढळून आला.
ट्रकची तपासणी केली असता यामध्ये प्रतिबंधक विषारी गुटख्याचे 28 पोती आढळून आली. बाजारभावानुसार याची किंमत 28 लाख 62 हजार 920 रुपये आहे. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक चालक गुलाम अहमद सलीम शेख (रा.भातब्रा ता.भालकी जिल्हा बिदर ) आणि त्याचा साथीदार अकमल अकबर शेख (रा. चिंचोळी ता. उमरगा जिल्हा उस्मानाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिसांच्या पुढील तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. कर्नाटकातील नांदगाव तालुका हुमनाबादमध्ये हा गुटखा बनविला जात असल्याची माहिती पुढे आली. सोलापूर पोलिसांनी सदरच्या ठिकाणी धाड टाकून या कारखान्यातून गुटखा फिलिंग पॅकिंग मशीन जप्त केल्या आहेत. तसेच अशोक लेलँड कंपनीचा मालट्रक (MH 25 U 1186) , आयशर ट्रक (MH 43 U 8435) या वाहनांमधून 69 पोती गुटखा जप्त करण्यात आला. तसेच त्या ठिकाणी उभी असलेल्या बोलेरो जीप (MH 12 RY 8824) या वाहनातून गुटख्याचे पाउच बनविण्याचे तीन बंडल कागद जप्त करण्यात आले. सदर ठिकाणाहून ओकार संदीप फंड, करण पप्पू प्रजापती यांना अटक करण्यात आली.
या तपासात सिकंदर उर्फ आजू भाई उर्फ अझरुद्दीन लियाकत तांबोळी (रा. चिंचोळी भुयार ता. उमरगा जिल्हा उस्मानाबाद) हा कारखान्यात तयार झालेला गुटखा महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुरवठा करण्याचे काम करतो. त्याला या कामात अझर आणि रमेश शिंदे मदत करीत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणातील अटक पाच आणि फरार चार असे नउ आरोपी गुटखा पुरवठा करण्याचे रॅकेट चालवित असल्याचे सिध्द झाले.
महाराष्ट्रात गुटखा कर्नाटकातून येतो हे उघड सत्य आहे . मात्र कर्नाटकात अजूनपर्यंत कोणावरही कारवाई झाली नव्हती. सोलापूर पोलिसांनी थेट कर्नाटकातच हात घातल्याने गुटखा पुरवठादारांचे धाबे दणाणले आहे. तर सोलापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुटखा रॅकेट चालविणार्यांवर मोक्का अंर्तगत कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरची राज्यातील ही मोठी कारवाई झाली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त बापू बांगर, उपायुक्त श्रीमती वैशाली कडूकर, सहाय्यक पोलिस उपायुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय जगताप , पोसई संदीप शिंदे, पोकॉ गणेश शिंदे, सोमनाथ सुरवसे, सागर गुंड , अश्रूमान दुधाळ, पाटोळे, इनामदार, नागटिळक, जावळे , वाळके, येळे, बागलकोटे, कुडले, यांच्या पथकाने केली.