Home सोलापूर सोलापूरात मॅरेथॉनवेळी स्फोट. एका महिलेसह १४ वर्षाचा मुलगा जखमी.

सोलापूरात मॅरेथॉनवेळी स्फोट. एका महिलेसह १४ वर्षाचा मुलगा जखमी.

1354
0

पंढरपूर:- सोलापुरात आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवेळी गॅसचा स्फोट झाला आहे. यामध्ये चौघे जखमी झाले. उद्घाटनासाठी फुगे फुगवत असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. या स्फोटामध्ये एका महिलेसह 14 वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रविवारी पहाटे सोलापुरातील एका संस्थेकडून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी परिसरात जवळपास पाच हजारांहून अधिक धावपटू जमा झाले होते. अचानक गॅसचे फुगे भरताना टाकीचा स्फोट झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल जाले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि यामागील कारण कोणते हे अद्यापही समजू शकलेले नाही पोलीस अधिक तपास करत आहेत.