Home महाराष्ट्र हुंड्यासाठी विवाहीतेसह दोन मुलांची हत्या. आत्महत्येचा केला बनाव.

हुंड्यासाठी विवाहीतेसह दोन मुलांची हत्या. आत्महत्येचा केला बनाव.

837
0

पंढरपूर:- माहेरून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये न आणल्यामुळे एका विवाहितेला तिच्या दोन मुलांना ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठार मारून तिने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर कंधार पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गोणार येथे घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उमरी तालुक्यातील इज्जतगाव येथील रंजनाचे लग्न कंधार तालुक्यातील गोणार येथील शरद पवळे याच्यासोबत 2009 मध्ये लग्न झाले होते. सुरवातीला विवाहिता रंजना हिला काही दिवस चांगले नांदवले. दरम्यानच्या काळात या दाम्पत्याला दिग्वीजय (वय नऊ) आणि वैभवी (वय सहा) अशी दोन गोंडस बाळं झाली. मात्र तिला माहेरून तीन लाख आणण्याचा तगादा लावला. पैसे नाही आणले तर तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. परंतु मुलीला सासरी होणारा त्रास कमी व्हावा म्हणू तिच्या वडिलानी कर्ज काढून दीड लाख रुपये दिले. मुलीला त्रास देऊ नका म्हणून विनंती केली. परंतु तिचा छळ काही कमी झाला नाही.

रविवारी सायंकाळच्या सुमारास याच कारणावरून या दाम्पत्यामध्ये वाद झाला. सासरच्या मंडळीनी संगनमत करून रंजनासह तिचा मुलगा दिग्विजय आणि मुलगी वैभवी यांना ठार मारले. आपल्या शेतात असलेल्या विहीरीत तीन्ही मृतदेह फेकून दिले. आत्महत्या केल्याचा बहाणा करून त्यांनी तिच्या माहेरी कळविला. त्यानंतर पतीसह सासरची मंडळी पसार झाले. याप्रकरणी व्यंकटेश बालाजी ढगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती शरद पंडित पवळे, पंडित नारायण पवळे, मयनाबाई पंडित पवळे, मनोहर पंडित पवळे आणि सुनिता मनोहर पवळे यांच्याविरुद्ध खून व विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.