Home देश /विदेश हैदराबाद गॅंगरेप गुंह्यातील चारही आरोपींचे एन्काउंटर , तपासावेळी पळण्याच्या प्रयत्नात असताना घातल्या...

हैदराबाद गॅंगरेप गुंह्यातील चारही आरोपींचे एन्काउंटर , तपासावेळी पळण्याच्या प्रयत्नात असताना घातल्या गोळ्या .

8146
0

पंढरपूर :- हैदराबाद गॅगरेप प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काउंटर करण्यात आल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. गुरुवारी रात्री घटनास्थळी या आरोपींना तपासासाठी नेण्यात आले होते. यावेळी या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले.

हे ते निपचित पडलेले आरोपी

हैदराबाद मधिल पशुवैद्यकीय युवतीची बलात्कार करुन जाळून मारण्यात आले होते. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती . आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती . महंमद पाशा, शिवा, केशव आणि नवीन अशी या आरोपींची नावे आहेत. ज्या ठिकाणी पिडीतेला जाळून मारले होते. त्याच पुलाखाली या चारही जणांना गोळ्या घातल्या आहेत.