Home देश /विदेश वाचा एका नागरिकाने कसा दिला होता चार दिवसांपूर्वी तेलंगणा सरकारला आरोपींच्या एन्काउंटरचा...

वाचा एका नागरिकाने कसा दिला होता चार दिवसांपूर्वी तेलंगणा सरकारला आरोपींच्या एन्काउंटरचा सल्ला. आणि त्यानुसारच झाले एन्काउंटर .

911
0

पंढरपूर:- हैदराबाद येथिल पशुवैद्यकीय डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ३ च्या दरम्यान एन्काउंटर केला आहे. २७ नोव्हेंबरच्या या बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद देशात उमटले होते. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती. देशवासीयांनी रस्त्यावर येवून तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला होता. असेच एक ट्वीट सध्या व्हायरल झाले असून यामध्ये चार दिवसांपूर्वी या आरोपींचा एन्काउंटर कसा करावा? याचा सल्ला तेलंगणा सरकारला देण्यात आला होता. या ट्विट नुसारच एन्काउंटरचा सगळा घटनाक्रम झाल्याचे दिसत आहे.

हेच ते ट्विट

कोनाफॅन क्लब या ट्विटर अकाउंट वरुन चार दिवसांपूर्वी या घटनेचा निषेध करण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्र्यांच्या ट्विटला रिप्लाय करुन आरोपींना घटनास्थळी नेऊन तेथे काय झाले हे त्यांना विचारावे. त्यावेळी ते पळून जाण्याचा प्रयत्न करतील आणि तेव्हाच त्यांना गोळ्या घाला असा सल्ला दिला होता. आता याच ट्विटचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर हे अकाऊंट डिलीट करण्यात आलं आहे. त्यामुळेच हेच ट्विट वाचून बलात्काऱ्यांचा एन्काउंटर करण्याचा निर्णय घेतला का असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.