Home पंढरपूर मुलीच्या सासूचा खून, ९ जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल .

मुलीच्या सासूचा खून, ९ जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल .

1570
0

पंढरपूर :- मुलीला त्रास देत असल्याच्या कारणावरून मुलीच्या सासूचा खून केल्याची घटना कासेगावात घडलीय. मारहाण झालेल्या सुनिता नारायण गुंड ( वय-५०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याबाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिता गुंड यांचा मुलगा शहाजी याचा विवाह कासेगाव येथिलच बळीराम गांडुळे यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलीस नांदवण्यावरुन आणि जाचामुळे भाग्यश्रीचे वडील आणि इतर नातेवाईकांनी १६ जानेवारी रोजी सुनिता गुंड यांना लाथाबुक्क्यांनी , पाईपने आणि हत्याराने मारहाण केली . आणि त्यांच्या अंगावरील दागिने , मोबाईल काढून घेतला. मारहाणीत सुनिता या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते . अखेर २१ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
शहाजी गुंड याने दिलेल्या फिर्यादीनुसार बळीराम गांडुळे , श्रीकांत गांडुळे, दत्तात्रय गांडुळे, लक्ष्मण गांडुळे, चिमाजी गांडुळे, हनुमंत गांडूळे, नाना गुंड, सोमनाथ गांडुळे आणि समाधान गांडुळे यांच्यावर भादवि ३०२ , ३२९, ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय . पुढील तपास पो. नि. किरण अवचर हे करीत आहेत.