धनगर आरक्षणासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर मैदानात. २० मे रोजी पंढरपूरात मेळावा .

पंढरपूर:-धनगर समाज आरक्षणासाठी भारीप बहुजन महासंघाचे नेते बाबासाहेबांचे नातू आता मैदानात उतरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 20 मे रोजी पंढरपुर येथे धनगर मेळावा घेण्यात येणार आहे. यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही याबद्दलची पुढील भुमिका ठरविली जाणार आहे. या सरकारने धनगर समाजाची फसवणुक केल्याचा आरोपे ॲड. आंबेडकर यांनी केला. धनगर समाज हा आजही आरक्षणापासुन वंचित असल्याने या समाजातील मुलांना शिक्षणामध्ये योग्य असे स्थान मिळत नाही यासाठी हा मेळावा घेण्यात येणार आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा होता. मात्र त्यांना जाणूनबुजून तुरुंगात ठेवले आहे . त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अन्यथा जामीन द्या अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. जामीन हा त्यांना संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, असे सांगत छगन भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
त्याचबरोबर ओबीसी समाजाकडे या सरकारने दुर्लक्ष केले असुन त्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत नाही. अशा प्रश्नाकरता आता पुढील दिशा लवकरच ठरविली जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, बेनामी तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. याप्रकरणी ते गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत..त्यामुळे सरकारने योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही यावेळी आंबेडकर यांनी केली.
दरम्यान संघाने 1951 दरम्यान भारतीय संविधान मानले नाही.अशा संघाच्या लोकांकडुन अपेक्षा ठेवण चुकीचे असुन खुद्द पंतप्रधान ओबीसी असुनही ओबीसी समाजाला न्याय मिळाला का किंवा या समाजातील मुलांना शिष्यवृत्ती लवकरच मिळत नाही ही मोदीची नौंटकी असल्याचे आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

20 comments

  1. My partner and I stumbled over here from a different website and thought I might check things out. I like what I see so now i’m following you. Look forward to exploring your web page for a second time.

  2. Hey just wanted to give you a quick heads up. The words in your article seem to be running off the screen in Opera. I’m not sure if this is a format issue or something to do with browser compatibility but I figured I’d post to let you know. The design look great though! Hope you get the issue solved soon. Many thanks

Leave a Reply

Your email address will not be published.

3 + 4 =

error: Content is protected !!