शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे पंढरीरत्न पुरस्कार जाहीर.

10 मे रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार गुणवंताचा गौरव 

पंढरपूर:- शिवबुध्द युवा प्रतिष्ठाच्या वतीने देण्यात येणारे पंढरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून गुरुवार दिनांक 10 मे रोजी येथील जाधवजी जेठाभाई धर्मशाळा येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्यात हे मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग सह.साखर कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक, तर प्रमुख पाहुणे म्हणुन आ.भारत भालके,कल्याणराव काळे,समाधान अवताडे,नगराध्यक्षा साधनाताई भोसले हे उपस्थित राहणार आहेत.

         या पुरस्कार सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून डॉ.बी.पी.रोंगे सर,प्रांताधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पिंगळे,तहसिलदार मधुसुदन बर्गे,न.पा.मुख्याधिकारी अभिजीत बापट,तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे,किरण घाडगे,श्रीधर कारंडे,प्रेमराज धनवले,कृष्णा वाघमारे,संतोष बंडगर,गजानन भिंगे,नानासाहेब करकमकर आदी उपस्थित राहणार आहेत.   

      शिवुबध्द युवा प्रतिष्ठाणच्या वतीने पंढरी रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्याचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत.1) उमादेवी कुणालगीर गोसावी 2) जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे 3) उत्कृष्ट समाजसेवीका मंगलताई शहा 4) साहित्यीक कवी लेखक रवी सोनार 5) आदर्श शिक्षक संतोष मोरे(खर्डी)6) ग्रामिण मराठी दिग्दर्शक भानुदास व्यवहारे(करकंब) 7) वैद्यकिय सेवा संस्था वसंतदादा काळे मेडीकल फौंडेशन भंडीशेगाव 8) क्रिडारत्न अभिषेक संजय ननवरे 9) उत्कृष्ट लघूपट रवीदत्त घोगरदरे यांना शिवबुध्द पंढरीरत्न विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहीती प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी दिली आहे.

         

3 comments

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen + 8 =

error: Content is protected !!