त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले अनावरण.

माता रमाईंचा त्याग हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जागतिक कीर्तीचा पाया आहे- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे दि. 30 – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सावली; कोट्यवधी बहुजनांची माऊली; त्यागमूर्ती महामता रमाई आंबेडकर यांच्या भारतातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज पुण्यातील वाडिया कॉलेजसमोरील मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात राष्ट्रपती महामहिम श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.यावेळी विचारमंचावर महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ चे विद्यसागर राव; केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री ना प्रकाश जावडेकर; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले; पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट ; महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे; राज्यमंत्री विजय शिवतरे; खासदार अनिल शिरोळे; महापौर मुक्ता टिळक ; उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आज अनावरण करण्यात आलेल्या माता रमाई आंबेडकरांच्या पुतळ्याची ऊंची 9 फूट आहे;मात्र त्यांच्या कर्तृत्वाची त्यागाची ऊंची अमर्याद आहे. यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो त्या उक्तीप्रमाणे रमाईंनी दिलेल्या साथीमुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांची असाधारण जीवनयात्रा; अमर्याद ऊंचीचे; जागतिक दर्जाचे कर्तृत्व घडले.थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक रमाईंना अर्पण करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी माता रमाई या हृदयाने प्रेमळ विशाल चारित्र्याने शुद्ध आणि शांतीपूर्ण धाडस असणाऱ्या हिम्मतवान स्त्री होत्या असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. एखादया उंच इमारतीला उभे राहण्यासाठी तिचा पाया अधिक मजबूत असावा लागतो तसेच माता रमाई आंबेडकर या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जागतिक उंचीच्या कर्तृत्वाच्या पाया झाल्या आहेत.त्यांच्या त्यागाला कर्तुत्वाला समस्त भारत देशवासीयांच्या वतीने वंदन करतो असे विचार राष्ट्रपती महामहिम डॉ रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकर यांचे जीवन प्रेरणादायी आहे.त्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पावलोपावली साथ दिली. त्यांचा देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा पुण्यात राष्ट्रपतींच्या हस्ते झाले याचा आंबेडकरी जनतेला आनंद आहे. असे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी माता रमाईंचा गौरव करणारे भाषण झाले. यावेळी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहील्याबद्दल मान्यवरांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानले. यावेळी पुण्यातील आंबेडकरी जनता मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होती. प्रेक्षकांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार नीलम गोऱ्हे; खासदार वंदना चव्हाण स्थानिक नगरसेविका हिमाली कांबळे; नगरसेविका राजश्री नवले; नगरसेवक विजय शेवाळे ; नगरसेविका सुनीता परशुराम वाडेकर नगरसेविका सोनाली लांडगे आसित गांगुर्डे चांद्रकांता सोनकांबळे बाळासाहेब जानराव; हेमंत रणपिसे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

4 comments

  1. You could certainly see your enthusiasm in the work you write. The arena hopes for even more passionate writers such as you who are not afraid to say how they believe. All the time go after your heart.

  2. Great ¡V I should definitely pronounce, impressed with your site. I had no trouble navigating through all tabs and related info ended up being truly easy to do to access. I recently found what I hoped for before you know it at all. Reasonably unusual. Is likely to appreciate it for those who add forums or something, website theme . a tones way for your customer to communicate. Excellent task..

Leave a Reply

Your email address will not be published.

six − one =

error: Content is protected !!